RAJTANTRA MEDIA
डहाणूतील युवक डॉ. केयूर भावेश देसाई हा वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम एम. एस. (ऑर्थोपेडीक्स) मध्ये 614 गुण (800 पैकी) मिळवून राज्यात अव्वल ठरला आहे. तो लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मध्ये मास्टर्स च्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता. केयूर डहाणूचे नगरसेवक तथा डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे संचालक भावेश देसाई यांचा सुपूत्र आहे. तो शालेय जीवनापासून शिक्षणात गुणवंत ठरला असून त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.