अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करू नये; डहाणू नगरपरिषदेचे आवाहन

0
1223

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर. दि 11 : डहाणू नगरपरिषद हद्दीतील लोणीपाडा-काटीरोड येथील बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे डहाणू नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाने डहाणू पोलीस स्टेशनच्या मदतीने दिनांक काल, जून रोजी कारवाई करून जमीनदोस्त केली. ही बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याबाबत अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी तक्रारी व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करणार्‍यांविरुद्ध नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, परंतु सदर नोटीसांना अनुसरून संबंधितांनी अनधिकृत व कायदेशीर बांधकाम न काढल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला व अशी अतिक्रमणे जमिनदोस्त केली.

त्याच प्रमाणे रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी दर्शनी भागात अनियमित बांधकामे विस्तारित केली होती. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांनी स्टॉल, तंबू, फळांच्या अनधिकृत हातगाड्या/टपर्‍या उभारून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना त्रास व वाहतुकीस अडथळा होत असल्याकारणाने त्यांच्यावरही मागील तीन दिवसांपासून कारवाई करण्यात आली. अशी कारवाई यापुढे देखील अधिक जोरकसपणे चालू ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. तरी सर्व नागरिक, दुकानदार व फेरीवाल्यांनी वाहतुकीस अडथळा होईल आणि नागरिकांना त्रास होईल असे अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करू नये. तसेच रीतसर परवानगी घेवूनच बांधकाम करावे, असे आवाहन डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments