तलासरीत डान्सबारवर कारवाई; हॉटेलमालकासह 22 जणांना अटक

0
1389
प्रातिनिधिक छायाचित्र

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 18 : येथील एका हॉटेलमध्ये विनापरवाना व छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या एका डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून एकुण 22 जणांना अटक केली आहे. यात हॉटेलचा मालक व त्याचे साथिदार तसेच व्यवस्थापक, कॅशियर, 6 महिला व 9 ग्राहकांचा समावेश आहे.

तलासरीतील आच्छाड येथील ग्रीन पार्क हॉटेलमध्ये महिला अश्‍लिल नृत्य व अश्‍लिल चाळे करीत असल्याची गुप्त माहिती पालिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अजय वसावे यांच्या पथकाने काल, बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास येथे छापा टाकला असता 8 महिला अश्‍लिल डान्स करत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी सदर महिला, डान्स बघणारे 9 ग्राहक, डान्सबारचे आयोजक निपम सुरेशभाई शाह व त्याचा साथिदार हशन शब्बीर खान तसेच हॉटेलचा मालक, व्यवस्थापक, कॅशियर अशा एकुण 22 जणांविरोधात गुन्हे दाखल केले असुन सर्वांना अटक केली आहे. आरोपींना डहाणू न्यायालयासमोर हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात वेश्याव्यवसाय सुरु असताना पोलिसांनी त्या स्वरुपाची कारवाई न केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments