डहाणूच्या वंदना कनोजा यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड!

0
2159

प्रतिकुल परिस्थितीत पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : वडिलांचे छत्र हरपलेले असताना प्रतिकुल परिस्थितीत व कोणतेही क्लास न लावता महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची (एमपीएससी) परिक्षा उत्तीर्ण झालेल्या वंदना राजाराम कनोजा हिची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झाली असुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

  डहाणूतील मसोली येथे रहावयास असलेल्या वंदना कनोजा यांच्या वडिलांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले असुन त्यांच्या आई एकट्यानेच संसाराचा गाडा हाकत आहेत. अशा परिस्थितीत वंदना यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली व पुढे अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहून एमपीएससी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. त्यानुसार त्यांनी जुलै 2017 मध्ये पूर्व परिक्षा व नोव्हेंबरमध्ये मुख्य परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. 

ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या शारिरिक चाचणी व मुलाखतीचा निकाल आला असुन वंदनाची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे कोणतेही क्लासेस न लावता स्वयंअध्ययनाने वंदनाने महाराष्ट्र राज्यात अनुसुचित जमातीतील मुलींमधुन 4 थ्या क्रमांकाने उत्तीर्ण होत हे यश मिळवले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments