कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0
1194

योजनेचे पैसे मंजूर करण्यासाठी केली होती लाचेची मागणी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : बिर्सा मुंडा कृषी योजने अंतर्गत विहिरीचा निधी मंजूर करण्यासाठी 23 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा कृषी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी-अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) जाळ्यात अडकला असुन बाळाराम पांडू दौडा (वय 40 वर्ष) असे सदर लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाळे येथील 28 वर्षीय तक्रारदाराचे बिर्सा मुंडा कृषी योजने अंतर्गत विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी कृषी अधिकारी दौडा याने 23 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी 1 मार्च रोजी एसीबीच्या पालघर कँम्पकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार एसीबीने 5 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी करुन लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 6 मार्च रोजी सापळा रचून कृषी अधिकारी दौडा याला तडजोडी करुन मान्य झालेली 20 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी कृषी अधिकारी दौडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments