पोलीस अधिक्षकांच्या पथकातील दोन अधिकार्‍यांवर खंडणीचा गुन्हा!

0
841

पालघर जिल्हा पोलीस खात्यातील भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर

वार्ताहर/बोईसर, दि. 3 : एका गुन्ह्यातील आरोपीला अटक टाळण्यासाठी तीन लाखांची मागणी करणार्‍या बोईसर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस उप निरिक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ अटक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पालघर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकातील दोन पोलीस अधिकार्‍यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्हा पोलीस खात्यातील भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर पोलीस अधिक्षकांच्या विषेश पथकाने आठवड्याभरापुर्वी बोईसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करत हजारो रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला होता. मात्र या प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी सदर पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांनी आरोपीला काही पैशाची मागणी केली होती. मात्र ही मागणी आरोपी पूर्ण करू शकत नसल्याने तसेच या अधिकार्‍यांकडून पैशासाठी दबाव वाढत असल्याने अखेर आरोपीने बोईसर पोलीस स्टेशन गाठत पोलीस उपनिरीक्षक थोरात व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवदे यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली. त्यानुसार या दोन्ही पोलीस अधिकार्‍यांसह त्यांच्या खाजगी हस्तकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करु नये यासाठी त्याच्याकडून 3 लाख रुपयांची लाच स्विकारणार्‍या बोईसर पोलीस स्टेशनच्या नेमणूकीतील प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) व नजीब नजीर इनामदार (38) या लाचखोर पोलीस अधिकार्‍यांना गेल्या 27 फेबु्रवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. आता थेट पालघर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकातील अधिकार्‍यांवरच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पालघर पोलीस खात्यातील भ्रष्ट्रचार चव्हाट्यावर आला असुन चर्चेला उधाण आले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments