राजतंत्र प्रतिनिधी
मोखाडा, दि.२८
मोखाडा, दि. २८: मोखाड्यातील सुर्यमाळ येथील सरकारी आश्रमशाळेतील मुलांना दोन दिवसांपासून मुख्याध्यापक रमेश नंदन याने दारूच्या नशेत मारहाण व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी स्थानिक व्यवस्थापन समितीने कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांना दिले आहे.
26 व 27 फेब्रूवारीच्या रात्री खोलीचा दरवाजा बंद करून 25 ते 30 विद्यार्थ्यांना ही कथित मारहाण झाल्याचे सांगण्यात येत असून नामदेव वाघमारे या विद्यार्थ्याला खोडाळ्यातील दवाखान्यात ऊपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी आश्रमशाळेत येऊन
याबाबत जाब विचारला. मात्र, मुख्याध्यापक रमेश नंदन तेथून पसार झाले. त्यानंतर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांना निवेदन देण्यात आले आहे.