राजतंत्र, प्रतिनिधी

बोईसर, दि. २७: एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करु नये यासाठी ३ लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या बोईसर पोलीस स्टेशनच्या नेमणूकीतील २ पोलीस उप निरिक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) व नजीब नजीर इनामदार (38) अशी या लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. या पोलीसांनी फिर्यादीकडून अटक टाळण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर १२, १४ व २१ फेब्रुवारी रोजी खातरजमा करण्यात आली. त्यानंतर आज सापळा रचून त्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. सापळ्यासाठी २ हजार रुपयांच्या 75 खऱ्या आणि 75 खोट्या नोटांचा वापर करण्यात आला.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा