मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारच्या धडकेत बिबट्या ठार

0
676

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 20 : कारने धडक दिल्यामुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई – अहमदाबाद महामार्गावर घडली असुन बिबट्याच्या धडकेनंतर नियंत्रण सुटलेल्या कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत. महामार्गावरील धानिवरी हद्दीतील आंबोली येथे हा अपघात घडला.

अंदाजे चार वर्षांचा मादी बिबट्या अहमदाबाद – महामार्ग ओलांडत असताना मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट डिझायर कारने त्याला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बिबट्या तेथेच कोसळला. तर धडकेत कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, बिबट्याच्या मृत्यूची घटना परिसरात वार्‍यासारखी पसरली व घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. वनविभागाला याबाबतची माहिती मिळताच उधवा वनविभागाचे कर्मचारी व कासा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments