उद्धव ठाकरेंचा पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांना संदेश

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 19 : भाजप-शिवसेनेच्या युतीच्या घोषणेनंतर आज, मंगळवारी मातोश्रीवर पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यात जिल्ह्याबाबत संघटनात्मक चर्चा करण्यात आली तसेच उमेदवारी मिळो ना मिळो पक्षासाठी कामाला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्याचे पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा यांनी सांगितले.
या बैठकीत श्रीनिवास वनगांसह पालघर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना भाजपच्या युती आधी शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा मागितली होती. युतीच्या घोषणेत शिवसेनेला भाजपने एक अधिकची जागा सोडली. त्यामुळे शिवसेनेची पालघर लोकसभा क्षेत्राची जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पालघर लोकसभेची जागा शिवसेनेसाठी सोडण्यास भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा तिव्र विरोध असुन या निर्णयाविरोधात विक्रमगड तालुक्यातील भाजप पदाधिकार्यांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे. तसेच हा निर्णय अंतिम झाल्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सामुदायिक राजीनामा देतील, असा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे पालघरच्या जागेवरुन सेना-भाजपात मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल सोमवारी भाजप आणि शिवसेनेले महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढवणार आहे. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा