गुटखा विक्री करणार्‍या तरुणाला कारावास व 1 लाखांचा दंड

0
2091

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 14 : आपल्या चारचाकी वाहनातून बेकायदेशिररित्या गुटख्याची वाहतुक करताना आढळून आलेल्या 24 वर्षीय तरुणाला न्यायालयाने 112 दिवस कारावास व 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. अब्दुल कादीर खान असे सदर तरुणाचे नाव असुन 11 डिसेंबर 2015 रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी गावच्या हद्दीत त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले होते.

अब्दुल खान विविध ठिकाणी गुटख्याचे चोरट्या पद्धतीने वितरण करत होता. 11 डिसेंबर 2015 रोजी चारोटी गावाच्या हद्दीतील अप्सरा हॉटेलसमोर पोलीसांनी त्याच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात बंदी असलेला गुटखा, तंबाखू व गुंगी आणणारे काही पदार्थ आढळून आले होते. याप्रकरणी त्याच्यावर कासा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 88, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानदे अधि. 2006 चे कलम 3(1)(झेड)(व्ही) 26(2)(1)26(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी अधिक तपास करत त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असता न्यायालयाने त्याला दोषी ठरवत 112 दिवस कारावासाची शिक्षा व 1 लाखांचा दंड ठोठावला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments