तलासरीमध्ये रेतीची माती खाताना, मंडळ अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

0
786

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. १४: अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच मागणारा तलासरीचा मंडळ अधिकारी सुनील पोपट राठोड (४५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. राठोडने ट्रकवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 35 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त होताच खातरजमा करुन सापळा रचला असता राठोडच्या सांगण्यावरून मध्यस्त माधव गुलाबसिंग ठाकुर याने 20 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना राठोड व ठाकूर या दोघांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक राजेश मयेकर, सहाय्यक फौजदार कदम,हवालदार वीचारे व सोंडकर, पोलीस नाईक संदेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Print Friendly, PDF & Email

comments