बोईसर : लविनो कपूर कंपनीच्या कामगारांचे कामबंद आंदोलन

0
2561

> कंपनीकडून अन्यायकारक वागणूक देत असल्याचा आरोप

LAVINO KAPOORवार्ताहर/बोईरस, दि. 21 : कंपनीकडून दिली जाणारी अन्यायकारक वागणूक तसेच आपल्या विविध मागण्यांकरीता तारापूर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) लविनो कपूर या कारखान्यांमधील तब्बल चारशे कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले असुन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदोनकर्त्या कामगारांनी दिला आहे.

लविनो कपूर ही वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या कापसांच्या वस्तुचे उत्पादन घेणारी कंपनी आहे. येथे शेकडो कामगार मागील तीस ते चाळीस वर्षांपासून काम करत आहेत. मात्र त्यातील केवळ 66 कामगारांना कंपनीत कायमस्वरूपी करुन घेण्यात आले आहे. तर उर्वरित कामगारांकडून ठेकेदार पद्धतीनेच काम करवून घेतले जात आहे. या कामगारांनी मुंबई लेबर युनियनच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाशी वेतन व इतर सोई-सुविधांशी संबंधित अनेक वेळा करार केले. परंतू कंपनीने या करारांकडे नेहमीच दुर्लक्ष केले. मुंबई लेबर युनियनमार्फत न्याय मिळत नसल्याने काही महिन्यांपुर्वी या कामगारांनी श्रमिक उत्कर्ष सभा युनियन स्थापन असता युनियन बदलल्यामुळे अनेक वर्षांपासुन कंपनीत काम करणार्‍या पाच कामगारांना कामावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्या कामगारांनी केला आहे. त्यामुळे या पाचही कामगारांना पुन्हा कामावर रुजू करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

कंपनीत महिला कामगारांना आठ तासांपेक्षा जास्त तास काम करावे लागते. एखादा जवळचा नातेवाईक मृत्यू पावल्यास रजा मिळत नाही. कामावर पोहचण्यास पाच ते दहा मिनिटं उशिरा झाल्यास अर्धा दिवसाचा पगार कपात केला जातो. पंधरा ते वीस वर्षांपासुन काम करत असलेल्या कामगारांना आजपर्यंत केवळ 12 हजार रुपयांपर्यंत पगार मिळत आहे. वर्षभरात मिळणारा बोनस देखील मिळत नाही. महिलांना आजारी पडल्यास रजा मिळत नाही आणि स्वत:हून रजा घेतल्यास कामावरून कायमस्वरूपी काढून टाकण्यात येते. कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षिततेबाबतही दुर्लक्ष केले जाते, अशा अनेक तक्रारी करतानाच इंग्रजांच्या काळात जेवढा अन्याय कामगारांवर झाला नाही तेवढा अन्याय कंपनी करत असल्याची हतलब भावना आंदोलकर्त्यां अनेक कामगारांनी बोलून दाखवली.

दरम्यान, याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

कामावरुन काढून टाकलेल्या 5 कामगारांपैकी तीन कामगारांना पुन्हा कंपनीत रुजू करुन घेण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. मात्र दोन कामगारांकरीता संपूर्ण कामगार वर्ग कामबंद आंदोलनात सहभागी झाला आहे. यासंदर्भात कामगार व कंपनी मालकासोबत बैठक घेऊन लवकरच तोगडा काढला जाईल.
-शिरीन लोखंडे, कामगार उपायुक्त

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments