आरती इंडस्ट्रीजमध्ये अ‍ॅसिड गळती, एक कामगार गंभीर जखमी

0
1096

वार्ताहर/बोईसर, दि. 20 : तारापूर एमआयडीसीतील आरती इंडस्ट्रीज या कारखान्यामध्ये पाईपमधून गळणारे अ‍ॅसिड अंगावर पडून एक कामगार गंभीररित्या भाजला असुन त्याला ऐरोलीच्या बर्न सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 18 डिसेंबर रोजी ही घटना घडली असुन या घटनेनंतर निष्काळजीपणा व वायुप्रदुषण केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज कंपनीला उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

तारापूर औद्योगिक परिसरातील डी-18 प्लॉट वर असलेली आरती इंडस्ट्रीज ही रसायन उत्पादन करणारी कंपनी आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कारखान्यातील एका पाईपला गळती लागल्याने त्यातून बाहेर पडलेले सल्फरट्राय ऑक्साईड (so3) हे ज्वलनशिल रसायन पाईपलगतच काम करत असलेल्या श्याम बाबू राम या कामगाराच्या चेहर्‍यावर व खांद्यावर पडल्याने सदर कामगाराचा खांदा व चेहरा गंभीररित्या भाजला आहे. या घटनेनंतर श्याम बाबू राम याला नवी मुंबईतील ऐरोलीच्या बर्न सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या अ‍ॅसिड गळतीमुळे हवा प्रदुषित होऊन काही काळ परिसरात काळोख पसरला होता. तसेच कंपनीलगतच्या रस्त्यांवरुन चालत जाणार्‍या कामगारांना मोठ्या प्रमाणात या अ‍ॅसिडची बाधा होऊन त्यांच्या घशाला व तोंडाला खाज येण्याचा प्रकार घडला असल्याचे काही कामगारांनी सांगितले.

असे घातक रसायन बनविणार्‍या कंपनीमध्ये कामगार जीव धोक्यात घालून काम करत असताना कामगारांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केल्याप्रकरणी तसेच वायु प्रदूषणास कारणीभुत ठरल्याने या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments