विराथन खुर्दच्या ग्रामस्थांनी रोखले बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण

0
697

BULLET TRAIN SERVE MAINप्रतिनिधी/मनोर, दि. 14 : सफाळे नजीकच्या विराथन खुर्द येथे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकर्‍यांना गावकर्‍यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. सुमारे 10 ते 15 अधिकारी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह याठिकाणी मोजणीसाठी आले होते. मात्र या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी सर्व्हेक्षण करू दिले नाही.

या गावात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादनात जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी नुकतेच येथे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. मात्र हे रुग्णालय ग्रामस्थांनी आंदोलन करत बंद पाडले होते. तसेच मागील आठवड्यातच बुलेट ट्रेनसाठी कर्ज पुरवठा करणारी जेआयसीए ही जपानी संस्था गुजरात दौर्‍यावर येऊन गेली. बुलेट ट्रेनला कर्ज पुरवठा मिळेल की नाही याबाबत पुनर्विचार सुरू असताना प्रशासन बुलेट ट्रेनसाठी सर्वे करुन शेतकर्‍यांची फसवणूक करत आहे, असा आरोप करत येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठीचे भूमापन रोखले.

बुलेट ट्रेन विरोधाचा लढा सामान्य जनतेनेच हाती घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही पुढार्‍यांची आता या आंदोलनाला गरज नाही, असे मत सागर सुतार यांनी यावेळी व्यक्त केले.
केंद्र सरकार शेतकरी, कष्टकरी वर्गाला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकार भारतीयांचे आहे की, जपानचे आहे हे कळायला मार्ग नाही, अशी टीका करतानाच राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला येणार्‍या काळात त्यांची जागा दाखवून द्या, असे प्रतिपादन काळूराम धोदाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी जोन्सा घरत, यादव घरत, बाळकृष्ण म्हात्रे, किशोर घरत, पुंडलिक घरत, सचिन घरत, जयंत किणी, सिध्देश्वर किणी, शशी सोनावणे, पौर्णिमा मेहेर, निलिमा पोसम आदि उपस्थित होते.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments