तारापूर औद्योगिक परिसरातील नऊ कारखान्यांवर कारवाईचा बडगा

0
863

बोईसर वार्ताहर
प्रदुषणास कारणीभूत ठरलेल्या तारापूर औद्योगिक परिसरातील बड्या सहा कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद करण्याचे आदेश देत व तीन कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून चांगलाच दणका दिला आहे.
तारापूर औद्योगिक परिसरात रासायनिक, वस्रोद्योग व स्टील निर्मिती यांसारखे दिड हजार कारखाने असून या कारखान्यांमधून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट सार्वcropped-LOGO-4-Online.jpgजनिक नाल्यात सोडले जाते. परिणामी कारखानदारांच्या या निष्काळजीपणामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर जमिनी नापीक झाल्या आहेत. तसेच औद्योगिक परिसरालगत असलेल्या गावातील बोअरवेल, विहिरींचे पाणी पिण्यासाठी व वापरण्यायोग्य राहिलेले नाही. सार्वजनिक नाल्याद्वारे प्रतिदिन हजारो लीटर सोडण्यात येणारे हे रासायनिक सांडपाणी थेट जवळच असलेल्या नवापूर-नांदगावच्या समुद्रात मिश्रीत होत असल्याने येथील मच्छीमार लोकांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या विरोधात मच्छीमार संघटनांनी हरित लवादाकडे दाद मागितल्याने हरित लवादाने प्रदुषण नियंत्रण मंडळाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येक कारखान्याचा सीओडी तपासून जे कारखाने नियमांचे उल्लंघन करून उत्पादन करत होते अशा सुमारे 50 ते 60 कारखान्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते.
मात्र उत्पादन बंद करण्याचे आदेश देऊनसुद्धा काही मोठ्या कारखान्यांत उत्पादन सुरु असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींवरुन प्रदुषण नियंत्रण मंडळाने रात्रीच्या सुमारास या मोठ्या उद्योगांची पाहणी केली असता आज 25 एप्रिल रोजी प्रदूषण मंडळाने आरती ड्रग्स, कॅम्लिन फाईन, आशिज इंटरमेरिटेरियन, रामदेव केमिकल्स, सिक्वेन्स सायिनटीफिक, युनियन पार्क या सहा रसायनिक उत्पादन घेणार्‍या कारखान्यांना उत्पादन बंद करण्याचे तर सेरॅक्स ओव्हर्सिस, फार्मसिटीकल प्रायव्हेट इंडीया लिमिटेड या कारखान्यांवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच ग्लेन फिल केमिकल्स या कारखान्याला करणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments