वाड्यात बंटी-बबली फेम कारनामा, नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

0
1198

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : मुंबईतील जे. जे. रुग्णालयात तसेच वाडा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर असल्याचे भासवून वाडा शहर व ग्रामीण भागातील युवक-युवतींना दवाखान्यात नोकरीला लावण्याचे अमीष दाखवून कोणाकडून 35 हजार, तर कोणाकडून 40 हजार रुपये उकळून लाखो रुपयांना गंडा घालणार्‍या महिलेस वाडा पोलिसांनी अटक केली असून बंटी-बबली फेम या कारनाम्याची एकच चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शहरातील मंगलपार्क येथे राहणारी मिनाक्षी विलास सांबरे ऊर्फ मिनाक्षी मारुती रहाटे या महिलेने तालुक्यातील गाळे येथे राहणारा राकेश सुरेश चौरे या आपल्या साथीदाराच्या सोबतीने स्वतः डॉक्टर असल्याचे भासवत तालुक्यातील अनेक युवक-युवतींना आनंद चंदावरकर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल तसेच इतर रुग्णालयांमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 35 हजार, 40 हजार अशा रकमा घेऊन त्यांना हॉस्पिटलच्या खोट्या लेटरपॅडवर नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरोपी महिलेचा शोध घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांच्या सहकार्याने वाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत मिनाक्षी सांबरे व राकेश चौरे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरूद्ध वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 420, 467, 468, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी आणखी कोणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी त्वरित वाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments