डॉ. व्हिक्टर यांना शहरात प्रॅक्टीस करण्यास मनाई

0
929

Rajtantra Media

Dr. VICTORडहाणू दि. 12 : येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. धर्मसेव्हलम व्हिक्टर ग्नानब्रारम यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी मेडीकल काऊन्सिलच्या निर्देशानुसार डहाणू शहरात वैद्यकीय व्यवसाय करण्यास मनाई करणारी नोटीस बजावली आहे. शहरात प्रॅक्टीस चालू ठेवल्यास फौजदारी कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. येथील हेमंत अनंत राऊत या नागरिकाने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर डॉ. व्हिक्टर यांनी आपला इराणी रोड (डहाणूरोड) येथील दवाखाना बंद केला आहे.

डॉ. व्हिक्टर यांच्याकडे डी. एन. अ‍ॅन्ड एस (ग्रामीण) ही वैद्यकीय क्षेत्रातील पदविका असून या शैक्षणिक अर्हतेची व्यक्ती केवळ ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करु शकते. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या करीता शासनाने काही काळ हा कमी कालावधीचा पदविका अभ्यासक्रम सुरु केला होता. मात्र डॉ. व्हिक्टर हे 1988 साली पदविका प्राप्त झाल्यापासून शहरातच दवाखाना चालवीत असल्याचे तक्रारदार हेमंत यांचे म्हणणे आहे. याशिवाय डॉ. व्हिक्टर यांना एम. डी. (एआयएम) डब्ल्यू. एच. ओ. ही पदवी मान्यताप्राप्त नसून तिचा वापर करण्यास शल्य चिकित्सकांनी नोटीसीद्वारे मनाई केली आहे.

याबाबत डॉ. व्हिक्टर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपल्याला वस्तुस्थितीच्या गैरसमजातून नोटीस देण्यात आली असून नोटीसीला उत्तरादाखल आवश्यक तो खुलासा व पुरावे सक्षम प्राधिकरणाकडे सादर केल्याचे सांगितले. लवकरच आपल्यावरील अन्याय दूर होईल व दवाखाना पूर्वरत सुरु होईल, अशी भावना डॉ. व्हिक्टर यांनी व्यक्त केली.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments