प्राध्यापक रोमिओ मस्कारेन्हास यांना डॉक्टरेट पदवी

0
491

राजतंत्र मीडिया/डहाणू दि. २५ : येथील सौ. सीताबाई रामचंद्र करंदीकर महाविद्यालयाचे प्राध्यापक रोमिओ मस्कारेन्हास यांना बीझनेस पॉलिसी ॲन्ड ॲडमिनिस्ट्रेशन या विषयावरील प्रबंधाबद्दल मुंबई विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph. D.) पदवी दिली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. रोमिओ हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असे प्राध्यापक आहेत. त्यांची कॉमर्सच्या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ५० पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर शिक्षण क्षेत्रासाठी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यातूनच त्यांनी व्हर्च्युअल क्लासरुमची कल्पना करंदीकर महाविद्यालयात राबवली. सातत्याने नवनवीन कल्पना राबविण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते खूप कार्यशील प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. माजी विद्यार्थ्यांना संपर्कात ठेवून महाविद्यालयासाठी विविध प्रकारे मदत मिळविण्यात देखील ते आघाडीवर असतात. अनुताई वाघ कनिष्ठ महाविद्यालयात देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांचा विविध सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो. ते डहाणू तालुका विकास परिषदेचे देखील सक्रीय सदस्य आहेत.
[divider]
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments