बोईसर येथे दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला

0
647

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : ओत्सवाल येथील एका कार्यालयात काम करणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कार्यालयात घुसून चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली असुन या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तर हल्ला करणार्‍या इसमाला येथील नागरीकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ओत्सवाल येथील मुख्य बाजारपेठ भागात पहिल्या मजल्यावर निधी एन्टरप्राईजेस नामक मनीट्रान्सफर केंद्र आहे. येथेे धोडीपुजा येथे रहावयास असलेली सदर मुलगी काम करत होती. हल्लेखोराने आज सुमारे 4 वाजताच्या सुमारास कार्यालयात घुसुन या मुलीच्या गळ्यावर चाकुने वार केला. यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली. यावेळी बाजुला असलेल्या कार्यालयातील वकील सचिन संखे यांनी लागलीच बोईसर येथील खासगी रूग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. सद्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असुन प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान हल्लेखोराला पकडून लोकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले असुन हल्ल्याचे नेमके कारण समजले शकलेले नाही. बोईसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments