दांडेकर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा दोन छात्रांची थल सेना कॅम्पसाठी निवड

0
1905

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यूज नेटवर्क
पालघर, दि. 26 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या 8 महाराष्ट्र गर्ल्स व 3 महाराष्ट्र बॉईज बटालिअन अंतर्गत येणार्‍या गर्ल्स व बॉईज एन.सी.सी. युनिट्समधून अनुक्रमे सार्जंट तन्वी अरूण पाटील व सार्जंट पारस दिगंबर पवार या दोन छात्रांची दिल्ली येथे होत असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा थल सेना कॅम्प (टी.एस्.सी.) साठी निवड झाली आहे. रिपब्लिक डे कॅम्पच्या धर्तीवर सातत्यपूर्ण निवड प्रक्रियेतून निवडून आलेले, संपूर्ण भारतातील एकूण 17 एन.सी.सी. निर्देशालयांमधले छात्र या शिबीरात सहभागी होतात. तन्वी व पारस मे महिन्यापासून टी.एस्.सी. साठीच्या निवड प्रक्रियेत निवडून येत होते. मॅप रिडिंग, रायफल शूटिंग, ड्रिल, ऑबस्टॅकल्स, टेन्ट पिचिंग, लाईन एरिआ आदि विषयांमध्ये प्राविण्य दाखवत व सातत्यपूर्ण कामगिरी करत ते टी.एस्.सी. दिल्ली येथील कॅम्पसाठी निवडून आले व सध्या दिल्ली येथे होत असलेल्या या कॅम्पमध्ये महाराष्ट्र निर्देशालयाचे (महाराष्ट्र डायरेक्टोरेट) प्रतिनिधीत्व करीत आहेत.

सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड्. जी. डी. तिवारी, प्राचार्य डॉ. किरण सावे, उपाध्यक्ष चंद्रकांत दांडकर व सुनिल चित्रे, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर व जयंत दांडेकर, कोषाध्यक्ष हितेंद्रभाई शहा यांनी या यशाबद्दल दोन्ही छात्रांचे अभिनंदन केले. एन.सी.सी. युनिट अधिकारी मेजर बी. के. साखरे व लेफ्टनंट अनघा पाध्ये यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन त्यांना लाभले. महाविद्यालय व व्यवस्थापनाने आपल्या छात्रांचा आभिमान वाटत असल्याचे कौतुगोद्गार काढले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments