डहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन

0
1114

RAJTANTRA MEDIA

डहाणू दि. २४: आज पालघर जिल्हा पोलीसांनी हॉटेल पिंक लेक मध्ये छापा मारुन अटक केलेल्या आरोपींमध्ये रामवाडी मित्र मंडळाचा अध्यक्ष शेखर सहामते याला अटक झाल्यामुळे या जुगाराच्या अड्ड्याचा संबंध रामवाडी मित्र मंडळाशी जोडला गेला आहे. सहामते हा डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा निकटवर्तीय असून राजपूत यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या रामवाडी मित्र मंडळाचा तो डमी अध्यक्ष आहे. या मंडळाच्या गणेशोत्सवासाठी आवश्यक त्या परवानग्या शेखर सहामते याच्या नावावर घेतल्या जातात. या आधी रामवाडी मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात पोलीसांनी छापा मारुन जुगारींना अटक केली होती. त्यानंतर अन्यत्र जुगार खेळवला जात असल्याची अटकळ मानली जात होती. आजच्या छापेमारी नंतर चित्र स्पष्ट झाले आहे. नव्या पोलीस अधिक्षकांनी जुगाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भरत राजपूत यांच्या मंडळात जुगार खेळवला जाणार नसल्याचे संकेत होते. मात्र सहामतेच्या अटकेने संशयाचे बोट रामवाडी मित्रमंडळाकडे रोखले गेले आहे.

भरत राजपूत यांनी आरोप फेटाळले: पिंक लेक मधील जुगार प्रकरणी रामवाडी मित्र मंडळाचा काहीही संबंध नाही. असा संबंध जोडणे योग्य नाही. शेखर सहामते यांचा त्यातील कथीत सहभाग हा वैयक्तिक स्वरुपाचा असल्याची भूमिका डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना व्यक्त केली.

आज अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे पुढीलप्रमाणे : शेखर सदानंद सहामते, निलेश मोहनलाल शहा उर्फ किकू, अमर रविंद्र भानुशाली, जितेन्द्र गजानन चंपानेरकर, इम्रान कमृद्दीन तांबोळी, प्रताप रत्नाकर, राजेश परशुराम पागधरे, रामदास उर्फ झिपू झावरे, शंकर गोपाळ शेट्टी, संतोष मेवालाल सोनकर, अफ्रोज निशाद खान, रविंद्र रमाकांत नाईक, संतोष शंभुलाल खत्री, महेश हणमंत वाघमारे, आनंद लक्ष्मण पुजारी, रोहिदास मंगाराम कुमावत, झुबिन दारा संजाणीया, बब्लू रामबालक चव्हाण, राजेश किशोर धोडी, इद्रिस गफूर खाटीक, रघुनाथ बबला माच्छी. या शिवाय हॉटेलच्या २ वेटर्सना आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांना आज डहाणू येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अटक आरोपींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेवी वेट कंत्राटदार मोठ्या संख्येने असल्यामुळे आणि त्यांची वरात काढल्यामुळे दिवसभर हा चर्चेचा विषय ठरला.

संबंधित बातम्या : डहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments