RAJTANTRA MEDIA
डहाणू दि. २०: डहाणू शहरातील वडकून येथे एका अल्पवयीन मुलीवर (१३) बलात्कार झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अजित राजेश दौंड (२०) असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पिडीत मुलगी गणेशोत्सवानिमित्त सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नृत्याचा सराव करण्याकरिता परिसरात आली होती. तेथून आरोपी तिला नजीकच्या कोळंबी प्रकल्पाजवळ घेऊन गेला व जिवाची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलीसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६ सह मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप तपास करीत आहेत.