आदिवासी विकासात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार? शरद पाटील यांची फौजदारी कारवाईची मागणी!

0
594

वैदेही वाढाण / राजतंत्र मिडीया

पालघर, दि. ४: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविल्या जाणाऱ्या ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेत एकट्या विक्रमगड तालुक्यातून २६ कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुबंई) या संस्थेने शासनास सादर केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाल्याने आता या भ्रष्ट्राचारास जबाबदार असलेल्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

दैनिक राजतंत्रचे App आजच Download करा आणि आपल्या मोबाईल वर बातम्या मिळवा!

ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून 2012 ते 2015 या आर्थिक वर्षामध्ये विक्रमगड तालुक्यातील 94 गावांपैकी 83 गावांसाठी 30 कोटी रुपये खर्चाची 304 विकास कामे मंजूर करण्यात आली होती. या कामाकरिता आदिवासी विकास विभागाने 30 कोटी चा निधी दिला गेला. मात्र आयआयटी च्या अहवालामध्ये 304 कामांपैकी 1 काम प्रत्यक्ष सुरू झाले नाही. 108 कामे प्रत्यक्षात जागेवर आढळली नाहीत. 57 कामांची अंदाजपत्रके नसल्याने ती झाली किंवा नाही हे तपासता आलेले नाही. 94 कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. 1 कामावर 4 वेळा बिले काढली आहेत. अवघी 42 कामे सुस्थितीत आढळली.

दैनिक राजतंत्रचे App आजच Download करा आणि आपल्या मोबाईल वर बातम्या मिळवा!

ठक्कर बाप्पा योजनेतून रस्ते, समाजमंदिर, मंगल कार्यालये, कूपनलिका, विहिरी, स्मशानभूमी, मोऱ्या, व्यायामशाळा, शौचालय, खेळाचे मैदान, गटार, संरक्षक भिंत यांसारखी कामे केली जातात. अशा प्रकारच्या विक्रमगड तालुक्यातील 304 कामांवर 30 कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र त्यातील अवघी 13 टक्के कामे झाली असल्याने जवळपास 26 कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा पाटील यांचा दावा आहे. अशाच पद्धतीने पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील कामांमध्ये 100 कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला असू शकतो अशी शंका पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक राजतंत्रचे App आजच Download करा आणि आपल्या मोबाईल वर बातम्या मिळवा!

App Download

Print Friendly, PDF & Email

comments