रक्षाबंधन दिनीच काळाचा घाला दुचाकींच्या अपघातात ३ ठार

0
1030

ACCIDENTदि. २७ : डहाणू – चारोटी – नाशिक रोडवरील सारणी येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भिषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यु तर दोन चिमुकले गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. स्वप्निल शिंगडा (२८) आणी त्याची पत्नी शर्मिला स्वप्निल शिंगडा (२५) व मनोज मोहन गुहे (२८) असे मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर शिंगडा दांपत्याचा 3 वर्षीय आरुष हा चिमुकला या अपघातातुन बचावला असून मनोज गुहे याची ४ वर्षीय चिमुकली मानवी हिची प्रकृती गंभीर असून तिला पुढील उपचारा करिता सिलवासा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डहाणू तालुक्यातील उर्से येथील रहिवाशी असलेले शिंगडा दाम्पत्य रक्षा बंधन सणासाठी आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. मात्र तेथून परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments