डहाणू: एस. आर. करंदीकर महाविद्यालय माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी सज्ज

0
1367

राजतंत्र मिडीया

दि. 9: डहाणूतील ज्ञानभारती सोसायटी संचलित एस. आर. करंदीकर महाविद्यालय शिक्षण क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या शनिवारी, 11 ऑगस्ट 2018 रोजीपासून येथे व्हर्च्युअल क्लासरुमसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम, कार्यशाळा यांची सुरुवात केली जात आहे. त्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमासाठी नूतन बाल शिक्षण संघाचे (कोसबाड) अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील महाविद्यालयांना वेब कॉन्फरन्सींग द्वारे नामांकीत महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन उपलब्ध करण्याच्या दिशेने करंदीकर महाविद्यालयाने महत्वपूर्ण असे पाऊल टाकले आहे. करंदीकर महाविद्यालयातून कोसबाडच्या अनुताई वाघ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गाशी संपर्क साधून या सुविधेचे उद्घाटन केले जाणार आहे. वेब कॉन्फरन्सींगद्वारे विद्यार्थी मार्गदर्शकांशी संपर्क साधून आपल्या शंकांचे समाधान देखील करुन घेऊ शकतील. करंदीकर महाविद्यालय एकाच वेळी 12 विविध ठिकाणचे वर्ग या व्यवस्थेद्वारे जोडू शकते.

शिक्षण क्षेत्राशी संबधीतांनी 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10 वाजता या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानभारती सोसायटीचे अध्यक्ष बोमन बरजोर इराणी, मानद सचिव सी. एम. बोथरा आणि प्राचार्य डॉ. रविंद्र घागस यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments