सोनोपंत दांडेकर महाविद्यालयामार्फत कांदळ वनांचे संरक्षण

0
828

KANDAL VAN SANRAKSHAN-DANDEKARराजतंत्र न्युज नेटवर्क
            पालघर, दि. ३१ : समुद्री पर्यावरण निर्मळ राखण्यात व त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यात कांदळ वने महत्वाची भूमिका पार पाडतात. मात्र ही कांदळ वने प्लास्टीक कचरा अडकून खराब होतात आणि त्यामुळे सागरी पर्यावरण खराब होते तसेच मातीची देखील धूप होते. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि पालघर वन विभाग यांनी शिरगाव येथे कांदळवन स्वच्छता अभियान आयोजित केले होते. या अभियानात महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्राच्या ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व जवळपास १५० किलो प्लास्टिकचा कचरा कांदळ वनातून काढून कांदळ वन स्वच्छ केले.
या कार्यक्रमास पालघर वनविभागाचे वनपाल शांताराम गोरे व महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. भूषण भोईर, स्वप्नील केणी, पूजा केणी, सुप्रीत नरवणकर, श्रुती दळवी व वनस्पतीशास्त्र विभागाचे दुष्यंत धांगडा, रुद्राक्षी राऊत, दक्षता पाटील आदी उपस्थित होते. येत्या काळात महाविद्यालयाच्या विविध विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पर्यावरण विषयक उपक्रम राबविले जातील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email

comments