वार्ताहर
वाडा, दि. १० : कोकण विभागिय आदिवासी कोकणा समाज सेवा संस्थेची पंच वार्षीक सभा नुकतीच ठाणे येथे पार पडली. या सभेत संपूर्ण कोकण विभागाच्या आदिवासी कोकणा समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भास्कर लडकू दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या सभेसाठी कोकणा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ठाणे महानगर पालिकेच्या नगरसेविका तसेच कोकणा समाजाच्या नेत्या कमळाताई चौधरी या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. यावेळी जयराम राऊत (ठाणे) व गुरुनाथ सहारे (पालघर ) याची सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेची उर्वरीत कार्यकारिणी पुढील सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निवडण्यात येईल असे यावेळी ठरविण्यात आले. या सभेत वाडा, ठाणे,वसई, विरार. मुंबई, विक्रमगड , जव्हार तसेच अन्य तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष भास्कर दळवी यांचा यावेळी समाज बाधवांच्या वतीन शाळ, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.