नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्याने नागरिक संतप्त

0
1857

IMG-20180629-WA0023वार्ताहर 
           बोईसर, दि. २९ : तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून पावसाळ्यात वाहत्या नाल्यांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात येते. अश्याच प्रकारे कोलवडे येथील नाल्यातून रासायनिक सांडपाणी वाहत असल्याहा प्रकार घडल्याने येथील नागरिक समाप्त झाले आहेत. 
एमआयडीसीत हजारोच्यावर कारखाने कार्यरत आहेत. यामध्ये स्टील, रसायन, कापड असे  उत्पादन करणार्या लहान मोठ्या कारखान्यांचा समावेश आहे. हे कारखाने अनेक वेळा रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नैसर्गिक नाल्यामध्ये सोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत . विशेषतः पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याने नाले वाहत असताना त्याचच फायदा घेऊन काही कारखानदार हे अश्या नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडत असतात. कोलवडे गावातील नाल्यामध्ये आज असाच प्रकार दिसून आला. येथील नाल्यात गडद लाल रंगाचे रासायनिक सांडपाणी सोडल्याने  नागरकांचा संताप पाहायला मिळाला. ह्याच नाल्यामधून नवापूर कडे जाणारी पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी आहे त्यामुळे या नाल्यातील रासायनिक सांडपाणी गळती लागलेल्या मार्गाने जलवाहिनीत मिसळून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल  अशी भीती व्यक्त केली जात आहे. अश्या घटनांबाबत वारंवार तक्रार करूनही तारापूर एमआयडीसी प्रशासन व संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अश्या प्रकारांना जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

             एमआयडीसीची जुनी पाईप लाईन आणि चेंबर काढून टाकावे असे आदेश आहे तरी देखील अनेक ठिकाणी अजूनही पाईप लाईन जशीच्या तशी असल्याने  कारखानदार त्याचा दुरुपयोग करून रासायनिक पाणी अवैध रित्या सोडत आहेत. त्यातच पावसाचा आधार घेत चोरीच्या मार्गाने रासायनिक पाणी सोडून प्रदूषण करणाऱ्या  अश्या कारखान्यावर शासनाने कडक कारवाई करावी. 
मनीष संखे
अध्यक्ष पर्यावरण दक्षता मंच  
Print Friendly, PDF & Email

comments