कुडूस येथे बेरोजगारांसाठी मेळाव्याचे आयोजन

0
843

अशोक पाटील/कुडूस, दि. 29 : केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजने अंतर्गत बेरोजगार तरूणांना बँकेद्वारे अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरूणांना या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशाने कुडूस येथील ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये 3 जुलै रोजी सुशिक्षित बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरूणांना याचा लाभ व्हावा, ग्रामीण भागातील स्वयंरोजगारांना एकत्र आणणे, स्वतःच्या जागेत रोजगार निर्माण करण्यास सहकार्य करणे, स्वकमाई वाढवून तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. इयत्ता आठवीपुढेचे शिक्षण झालेल्या व अठरा वर्षावरील तरूण या मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात. यात उत्पन्नाची मर्यादा नाही. मेळाव्याच्या ठिकाणी अर्ज भरून घेतले जातील. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली समिती अर्जांची छाननी करून लाभार्थांची निवड करण्यात येते. याबाबत अधिक माहितीसाठी मुस्तफा मेमन (दुरध्वनी क्र. 9890003674), डॉक्टर गिरीश चौधरी (दुरध्वनी क्र. 7875343444), रफीक मेमन (दुरध्वनी क्र. 9970143955) यांच्याशी करावा, असे आवाहन वाडा विकास समितीकडून करण्यात आले आहे.

3 जुलै 2018 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत कुडूस ग्रामपंचायतीच्या सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इच्छूकांनी सोबत आपला फोटो, आपला प्रोजेक्ट बायोडाटा व आवश्यक प्रमाणपत्र आणावीत, अशी माहिती वाडा विकास समितीकडून देण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments