मोखाडा तालुक्यातील दुर्गम ब्राम्हणपाड्यात सौरऊर्जा पंपाद्वारे पाणी पुरवठा

0
594

IMG-20180620-WA0052प्रतिनिधी
          जव्हार, दि. २४ : पालघर जिल्हात मोखाडा हा अत्यंत दुर्गम तालुका म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायती हद्दीतील ब्राम्हणपाडा येथील ग्रामस्थ अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत होते. पाड्यापासून १७०० मीटर अंतरावर असलेल्या विहारीवरून पाणी आणतांना महिलांसह सर्वच ग्रामस्थांचे मोठे हाल होत असत. मात्र आता प्रगती प्रतिष्ठान संस्थेने ब्राम्हणपाडा येथे सौरऊर्जा पंपाद्वारे नळपाणी योजना आणल्याने गावातंच पाण्याची व्यवस्था झाली असून आपल्या घराजवळच पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
ब्राम्हणपाडा येथील ग्रामस्थ अनेक वर्षापासून शासन दरबारी नळपाणी योजनेसाठी प्रयन्त करीत होते. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. अखेर प्रगती प्रतिष्ठान व बँक ऑफ अमेरिका यांच्या सहकार्याने हि नळयोजना २ महिन्यात पूर्णत्वास आली. या योजनेचा  उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला.  प्रगती प्रतिष्ठान संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.अनुजा पुरंदरे यांच्या हस्ते या नळपाणी इ योजनेचे उद्दघाटन झाले. यावेळी आसे ग्रामपंचायत चे सरपंच ईश्वर दिघा, प्रगती प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत पाटील, व पंचायत समितीच्या सदस्या संगीता दिघा, यांच्यासह ४०० ग्रामस्थ उपस्थित होते. ब्राम्हणपाड्यासह जवळच असलेल्या जांभळीचापाडा येथील ग्रामस्थ मिळून एकूण १९२कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळत आहे.
महिलांचे पाण्यासाठी होणारे श्रम व वेळ वाचावा तसेच प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने प्रगती प्रतिष्ठान संस्था विविध ठिकाणी नळपाणी योजना प्रकल्प राबवित आहेत. आज पर्यत संस्थेने जव्हार, मोखाडा, विक्रमगड, व वाडा अश्या एकूण चार तालुक्यातील ८० गावात नळपाणी योजना राबविल्या आहेत व या सर्व योजना लोकसहभागातून व्यवस्थित सुरु आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी बायोसॅनिटाझर व युफ फिल्टर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरम्यान नागरिकाने शुद्ध पाणी मिळू लागल्याने अश्या भागातील आजारांचे प्रमाण ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

Print Friendly, PDF & Email

comments