महामार्गावरील अपघातात चौघांचा मृत्यू, ३ जखमी क्रूझर जीपचा टायर फुटूल्याने झाला अपघात

0
656
download (2)download (1)प्रतिनिधी
          मनोर, ता.२४ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे येथे जीपच्या टायर फुटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत.
          शनिवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवरून मुंबईकडे चाललेल्या एम. एच. १५ इ. एक्स. ७५५९ या क्रमांकाच्या क्रुझर जीपचा ढेकाळे पुलाजवळ टायर फुटला. त्यामुळे वेगात असलेली जीप दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. या अपघातात टेम्पोचालकासाहित तीघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. जखमी असलेल्या तिघांना वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मयत व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
Print Friendly, PDF & Email

comments