निवडणुकीच्या राखीव कर्मचा-यांना मानधन न देताच  दाखविली  घरची वाट

0
853
LOGO-4-Onlineप्रतिनिधी   
कुडूस, दि.२९ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्रावर प्रशिक्षण दिलेल्या १५ हजार ७०० कर्मचा-यांपैकी सहा विधानसभा मतदार संघातील साधारण दीड हजार कर्मचा-यांना प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी मानधन न देताच रिकाम्या हाती घरी जाण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्याने कर्मचारी संतापले आहेत. 
             पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 2984 मतदान केंद्रावर काम करण्यासाठी १५ हजार ६२२ कर्मचारी प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले होते. हे सर्व कर्मचारी आपली सुट्टी, आपले फिरणे व आपली घरातील कौंटुबिक कामे बाजूला ठेवून शासकीय जबाबदारी पार पाडण्यासाठी आले. निवडणूकीच्या प्रशिक्षणासाठी स्वतःचा खिचा रिकामा करून १६, २३, व २७  मे असे तीन दिवस हे कर्मचारी हजर राहिले. मात्र निवडणूकीच्या पूर्वसंध्येला तुमचे काम संपले तुम्ही आता घरी जा. उद्या येवू नका. असे तोंडी आदेश देवून त्यांना घरच्या वाटेल लावण्यात आले. या वेळी कर्मचा-यांनी भत्त्याविषयी विचारले असता थातुरमातुर उत्तर देण्यात आले. तीन दिवस प्रशिक्षणासाठी येण्याजाण्याचा खर्च व भोजन खर्च कर्मचा-यांनीच केला, मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. यात महिला कर्मचारी मोठ्या संख्येने होत्या.
             प्रत्येक निवडणूक कामासाठी शिक्षकांना कायद्याचा धाक दाखवून कामाला लावले जाते. अनेकांना राखीव म्हणून बसवून ठेवले जाते. नंतर रिकाम्या हाती घरी हाकलले जाण्याचे प्रकार घडत असतात. या मुळे शिक्षक मानसिक तणावात असतात. मतदार याद्या जमा करणे, याद्या तलाठ्यांना देणे. गटशिक्षणाधिकारी व तहसीलदार यांच्या कडे याद्या जमा करणे. इत्यादी कामे शिक्षक मान खाली घालून करीत असतात. त्यामुळे हि वाढती मनमानी थांबवावी व प्रामाणिकपणे निवडणूक व शासकीय कामे करणा-या शिक्षक कर्मचा-यांना सन्मानाची वागणूक द्यावी. अशी मागणी संघटनेच्या प्रतिनिधींनी केली आहे.
Print Friendly, PDF & Email

comments