राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर दि. १७ : पालघर लोकसभा निवडणुकीत कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पालघर तहसीलदार कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदात व्ही. दि. दळवी याना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक निर्यण अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी हि कारवाई केली आहे.
पालघर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन, २८ मी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी पालघर तालुक्याचे निवडणूक नायब तहसीलदार व्ही. दि. दळवी यांच्याकडे पालघर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक विषयक विव ईड्क्सह कामांची जबाबदारी सोपविण्यक्त आली होती. परंतु दळवी यांनी याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. तसेच त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी या कामात हलगर्जीपणा केला. त्यातच ते निवडणूक प्रक्रिया सुरु असताना विनापरवानगी गैरहजर होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांनी नायब तहसीलदार यांच्यावर कामात हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे.