राजतंत्र न्युज नेटवर्क
दि. ०८ : काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी आज मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पालघर पोटनिवडणुकीच्या पाश्ववभूमीवर गावित यांचा पक्षाला रामराम करणं काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. भाजपाची राजकीय खेळी काँग्रेस बरोबरच स्वतःच्या निष्ठावंतांना अडगळीत टाकून वनगा कुटुंबियांना न्याय देण्यासाठी उभी ठाकलेली शिवसेनेलाही काटशह देणारी मानली जात आहे.
आदिवासी समाजातील काँग्रेसचा मोठा चेहरा समजल्या जाणाऱ्या राजेंद्र गावित यांनी आघाडी सरकारच्या काळात राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री पद भूषवले आहे. आज सकाळपासूनच पालघर पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राजेंद्र गावित भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचे गावित यांनी स्पस्ट केले होते. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून काँग्रेस पक्षातच रहाणार असल्याचे त्यांनी म्हंटले होते. मात्र संध्याकाळी भाजपमध्ये ज्ञातांच्या विरोधात आयाराम आणण्याच्या प्रयत्नांना यश आले. आणि गावित यांनी अधिकृत रित्या पक्षप्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. दरम्यान, पालघर पोटनिवडणुकीच्या उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून गावित यांचे नाव संसदीय बोर्डाकडे पाठवले जाणार आहे. त्यानंतर गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. त्यामुळे हि लढाई श्रीनिवास वनगा विरुद्ध राजेंद्र गावित अशी रंगण्याची शक्यता आहे.
अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याची आशा! – मुख्यमंत्री
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत चिंतामण वनगा यांच्या मुलालाच भाजपकडून तिकीट मिळणार आहे, मात्र जे झाले ते दुर्दैवी झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पालघरचे जागा भाजपाची आहे. शिवसेनेने माघार ग्यावी, अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याची आशा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालघरमध्ये चिंतामण वनगा यांनी पक्ष वाढवला. त्यामुळे पालघरमध्ये भाजपने विजय मिळविला नाही तर ती त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरणार नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी हि जागा जिंकण्याचाही निर्धारही व्यक्त केला.
जनता गद्दारांना धडा शिकवेल! – अशोक चव्हाण
राजेंद्र गावित यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असून गावित हे गेल्या काही दिवसापासून भाजपच्या संपर्कात होते. म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षात राहून पक्षाशी गद्दारी केली आहे. पपालघर लोकसभा मतदार संघातील जनता गद्दारांना धंदा शिकवेल, अशी घणाणती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खा, चव्हाण म्हणाले की, भाजपचा उमेदवार शिवसेनेने पळवला म्हणून भाजपने गावितांना पळविले. पक्षनिष्ठा नावाचा प्रकार राहिला नाही. भाजप पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून नेत्यांची पळवापळवी करीत आहे. भाजपने नैतिकता सोडली आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष अस्या वलग्ना कया एक umedvarhरणाऱ्या भाजपला स्वतःची मिळू नये हे लांछनास्पद आहे. भारतीय जनता पक्षाची किंवा करावीशी वाटते. राजेंद्र गावित दोनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना मिळणार नाही ह्याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती. अश्या पडेल उमेदवाराला घेऊन भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. जनता अशा पडेल उमेदवाराला आणि भाजपला पुन्हा तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला चव्हाण यांनी यावेळी केला.
कॉग्रेसकडून दामू शिंगडा यांना उमेदवारी?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी खा. दामू शिंगाडा यांची पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे शिफारस केली आहे. पक्षश्रेष्ठी त्याबाबत लवकरच निर्णय घेतील असेही चव्हाण म्हणाले.