अखेर श्रीनिवास वनगांना सेनेची उमेदवारी, आज उमेदवारी अर्ज भरणार

0
887

shrinivasवार्ताहर :

             भारतीय जनता पक्षाचे दिवंडत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून भाजपाला धक्का देणारे खा. वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा आज, मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पाश्ववभूमीवर शिवसेनेत काल, सोमवारी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा बोलावून उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने जमा होण्याचे आदेश दिले आहेत.
खासदार वनगांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी येत्या २८ मी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत वनगांच्या राजकीय वारसांना उमेदवारी द्यावी असा सूर वनगा समर्थकांनी लावून धरला होता. मात्र पक्ष नेतृत्व त्याकडे फारसा उत्साही असल्याचे दिसत नसल्याने वनगा कुटुंबासह त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. पक्ष नेतृत्वाकडे वारंवार वेळ मागूनही ती दिली गेली नसल्याने नाराज झालेल्या वनगा कुटुंबीयांनी ३ मी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत सेनेत प्रवेश केला होता. सेनेत प्रवेश केल्यानंतर पालघरमधील शिवसैनिकांनी श्रीनिवास याना उमेदवारी देण्यासाठी सतत बैठक घेवुन आपला निरोप मातोश्रीवर पोहोचवला होता. त्यानुसार मातोश्रीवरून श्रीनिवास याना उमेदवारी देण्यासाठी सतत बैठक घेवुन आपला निरोप मातोश्रीवर पोहोचवला होता. त्यानुसार मातोश्रीवरून श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्जइ उमेदवारी भरण्याचे आदेश येताच सोमवारी शिवसैनिकांची सभा पार पडली. या सभेस उपस्थित तालुका प्रमुख नीलम संखे व शहर प्रमुख मुकेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी पालघर जिल्हा सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, पालघर तालुका महिला संघटक, नीलम म्हात्रे, उपसभापती मेघन पाटील, जिल्हा परिषद सदस्य कमलाकर दळवी, पंचायत समिती गटनेता सुभाष म्हात्रे, पंचायत समिती सदस्य पांडुरंग गोवारी, ज्योती पाटील, संध्या खुंटे, माजी जिल्हापरिषद सदस्य दुमडा गोपीनाथ घरात, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments