सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामास पुन्हा सुरूवात.

0
734

Manor News2प्रतिनिधी 

            मनोर, ता.21: पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या तीव्र विरोधाला झुगारून सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनच्या पाईपलाईन चे सर्वेक्षण आणि ड्रीलिंग चे काम ठेकेदार एल अँड टी कंपनी मार्फत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या मेंढवन आणि सोमटा गावच्या हद्दीत तीन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा योजनेस विरोध करण्यासाठी 19 मार्च रोजी सूर्या पाणीबचाव संघर्ष समिती मार्फत बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेत आंदोलन अधिक तीव्र केल असता अखेर 22 मार्चला पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांनी पाणीपुरवठा योजनेचे 4 एप्रिल पर्यंत काम थांबवण्याच्या आदेश दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
दरम्यान संघर्ष समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. पाणीपुरवठा योजनेचा निर्णय मुख्यमंत्रांच्या अखत्यारीत असताना देखील काम पुन्हा सुरू झाल्याने ग्रामीण भागात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगी बाबत विचारले असता ती दाखवण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली.

आमच्या शेतीला पाणी नाही तसेच पिण्याच्या पाण्याची

समस्या गंभीर होत असताना आमच्या हक्काचे पाणी

पळवून नेलं जात असेल तर मनसे तीव्र आंदोलन घेईल.

जबी राऊत, उपतालुका अध्यक्ष, मनसे 

Print Friendly, PDF & Email

comments