राजतंत्र न्यु नेटवर्क
पालघर दि. १९: पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विसनू सवरा यांनी आज, पालघर जिल्हा मुख्यालयाच्या सर्व इमारतींची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभाग व कंत्राटदारांना दिले. सवरानसह जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी नवनाथ जर, तहसीलदार महेश सागर, सिडको अभियंता देसापांडे व खंडाळकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने १ ऑक्टॉबर २०१६ च्या अधिसूचनेद्वारा एमआरटीपी एक्ट, १९६६ च्या कलम ११३ (३ अ) नुसार सिडको महामंडळाची ४४०-५७-९७ हेकटरक्षेत्रफळाच्या परिसरासाठी पालघर नवीन शहर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. एकूण ५हजार ३४४ चोरी. कि. मी. क्षेत्रफळावर पसरलेल्या पालघर नवीन शहर प्रकल्पामध्ये पालघर, कोळगाव, मोरेकुरण, नांदोरे, दापोली, टेम्भोडे व शिरगाव या सात महसुली गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीत १५० कोटी रुपयांच्या बांधकामाची निविदा अंतिम करण्यात आली आहे. एकूण प्रकल्प खर्च ३ हजार ५०० कोटी पर्यंत आहे, त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, २ प्रशासकीय इमारती, जिल्हा परिषद प्रशासनातर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दरम्यान वेगाने सुरु असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या कामाबाबत सावरा यांनी समाधान व्यक्त केले, तसेच गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.