रेल्वेचा निर्णय पासधारक प्रवाशांवर अन्यायकारक प्रवासी संघटनांचा आरोप

0
644

Boisar Newsप्रतिनिधी
बोईसर, दि. 17 : रेल्वे प्रवाशांच्या मासिक , त्रैमासिक पासधारकांना आरक्षित व स्लीपर डब्यातून प्रवास नाकारल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून सरकार रेल्वे प्रवशांवर अन्याय करत असल्याचा आरोप वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था व डहाणू प्रवासी संघ या संघटनांनी केला आहे. दरम्यान या निर्णयाचे पडसाद पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत होण्याची शक्यता अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे. डहाणू लोकल सुरू झाल्यापासून प्रवासी बांधवांना मुबंईला प्रवास करणे सोपे झाले.मात्र दररोज नोकरीनिमित्त प्रवास करणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरामध्ये आहे. या प्रवाशांच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न रेल्वे विभागाला मिळत असताना प्रवाशांना सोयीसुविधा देण्याऐवजी ह्या सुविधा काढून घेतल्या जात असल्याचा आरोप प्रवासी करत आहे. नियमित प्रवास करणार्‍या त्रैमासिक पासधारकांनी आता पास काढले असता त्यावर ’आरक्षित शयनयान डिब्बो में यात्रा की अनुमती नहीं हैं ’ अशा मजकुराचा छापा मारण्यात आला आहे. त्यामुळे डहाणू ते वैतरणा भागातील दररोज जाणारे प्रवाशांनी लोकशक्ती ,फ्लाईंग राणी, सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस, राणकापुर, अशा एक्सप्रेस गाड्याच्या स्लीपर डब्यामधून प्रवास केल्यास त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे हा छापा प्रथम दर्जाच्या पासवरही देखील मारण्यात आल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत . रेल्वे प्रशासनाने लादलेल्या ह्या निर्बंधाचा प्रवाशी संघटनांनी तीव्र निषेध केला असून याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था व डहाणू प्रवासी संघाने दिला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments