
मनोर, ता. १६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 127 वी जयंती मनोर नजीकच्या दहिसर गावात साजरा करण्यात आली. दहीसरच्या सिद्धार्थ नगर मध्ये प्रथम बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर बामसेफचे महेंद्र कापसे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
शिका,संघटित व्हा, संघर्ष करा ही बाबासाहेबांनी समाजाला दिलेली शिकवण कायम स्मरणात ठेऊन प्रबोधनपर व समाजाभिमुख कार्यक्रम घेऊन आपण आपल्या समाजाचा स्तर उंचावला पाहिजे तसेच इतर समाजाच्या लोकांना बाबासाहेबांच्या जयंती उत्सव कार्यक्रमामध्ये सामावून घेत बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले कार्य आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी बामसेफच्या महेंद्र कापसे यांनी केले.
यावेळी दीपस्तंभ प्रतिष्ठान वसईचे निलेश दळवी,सिद्धार्थ बाविस्कर, बरकू काटेला, दहिसर सिद्धार्थ नगरचे मिठाराम जाधव,महेश जाधव,गौरव जाधव,राज जाधव,रुपाली जाधव,मनीषा जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.