मनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.

0
449
20180414_185322प्रतिनिधी 
             मनोर, ता. १६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त मनोरच्या आंबेडकर नगर येथे पंचशील मित्र मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
           आंबेडकर नगरातील बुद्धीविहारात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला.सायंकाळी वेळगाव रोडवरील आंबेडकर नगर येथून काढण्यात आलेली मिरवणूक पोलीस स्टेशन, मशीद गल्ली,मुख्य बस स्थानक मार्गे पुन्हा आंबेडकर नगर येथे आल्यावर मिरवणुकीचा समारोप झाला.मनोरमधील प्रतिष्ठित नागरिकांच्या भाषणाने जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला.
            यावेळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी मनोरचे उपसरपंच कैफ रईस, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, माजी सरपंच शालिनी जाधव, माजी उपसरपंच सोमनाथ धनगावकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत घोसाळकर, सुरेश जाधव, मंगेश बोरकर, गणेश घोलप, रुपेश घरत, संजय मळेकर, विष्णू कुवर, संजय घरत, अनंता पुंजारा, संतोष गोऱ्हेकर, महेंद्र जाधव, मनोहर गायकवाड, ग्रामस्थ व मोठ्या संखेने महिला उपस्थित होत्या.
           कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात पंचशील मित्र मंडळाचे वैभव धनगावकर सचिन धनगावकर,प्रीतम अहिरे,गौतम धनगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Print Friendly, PDF & Email

comments