
जव्हार, दि. १५ : भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर याच्या १२७ व्य जयंती निमित्त काल, १४ एप्रिल रोजी शहरातील विजयस्तंभ ते अंबिका चौकदरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच येथी यशवंत नगर मध्ये व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम बाबासाहेब आंबेडकरांसह महात्मा फुले, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून बाबासाहेबानी केलेल्या कामाचा उजाळा देण्यात आला. यावेळी जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी वैभव विधाते, तहसीलदार संतोष शिंदे, माजी नगरसेवक दिनेश भट, रियाज मणियार, डॉ. हेमंत मुकणे, उत्सव समिती अध्यक्ष गोविंद बल्लाळ, हरिशचंद्र भोये, जयेश लोखंडे, काशिनाथ साळवे, कुणाल बल्लाळ, छाया बल्लाळ, उपाध्यक्ष वसंत धांडे, उत्तम शेवाळे, मीनाक्षी पांडे, प्रवीण मुकणे, किशोर जाधव, सर्वेशकुमार साळवे, व सर्व जयंती उत्सव समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.