बोईसर : कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार दाखल

0
1822
LOGO 4 Onlineवार्ताहर
बोईसर दि. २९ कामगारांच्या वेतनातून कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीचा नियमियपणे भरणा न करणाऱ्या तारापूर औद्यगिक परिसरातील काही नामांकित कारखान्याविरोधात भविष्य निर्वाह निधी विभागाने तहसीलदार व पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
         क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त उदय बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली  दिल्ली  येथील सेंट्रल इंटिलिजिट युनिट  मार्फत तारापूर औद्योगिक परिसरातील कामगारांचे भविष्य निर्वाह निधी जमा  न करणाऱ्या कारखान्याची माहिती मिळताच तारापूरचे भविष्य निर्वाह निधी इन्स्पेक्टर यांनी कापड
उद्योगातील  नामांकित असलेल्या व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली ७१.८१ लाख रुपये कपात केलेल्या मे.बोमबे रेयान, ९.२४ लाख रुपये कपात केलेल्या रसायन उत्पादन करणाऱ्या मे. साळवी केमिकल इंडस्ट्रीज. लिमिटेड, १९.३६ लाख रुपये कपात केलेल्या मे. युनिटेक फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांवर कामगारांच्या वेतनातून कपात केलेल्या व कारखान्याच्या वाटणीच्या पैशांचा भरणा न केल्याने पालघर तहसील कार्यालयामध्ये सीआरपीसी कायद्यांतर्गत कलाम ११० नुसार व पोलीस अधीक्षकांकडे आयपीसीचे कलाम ४०६ व ४०९ नुसार तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी योग्य ती चैकशी करून नंतर गन हा नोन्दविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सादर कंपन्यांकडून कामगारांचे एक प्रकारे शोषण हात आहे. कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला व सरकारी भविष्य निर्वाह निधी हा त्यांचा हक्काचा असून जर कारखानदार भविष्य निर्वाह निधी भरत नसतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. तसेच तारापूर औद्यगिक परिसरातील जे कारखानदार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा भरणा करीत नाहीत अस्या कंपन्यांचीही चौकशी करून त्यात अनियमितता आढळल्यास अश्या कारखान्यांवर देखील कारवाई करणार येणार असल्याचे घयावत यांनी सांगितले
Print Friendly, PDF & Email

comments