डहाणू: चिमुरड्यांशी अश्लील वर्तन, रवींद्र मुकणेला ३ वर्षाची शिक्षा

0
1384

LOGO 4 Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
       पालघर दि. २७ तिन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी डहाणूतील रवींद्र भाऊराव मुकणे नामक आरोपीला न्यायालयाने ३ वर्षे कारावासाची शिक्षा तसेच ४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
२० नोव्हेंबर २०१४ रोजी डहाणूतील दीप नगर येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय रवींद्र मुकणे याने शेजारी राहणाऱ्या ३ अल्पवयीन मुली इमारतीच्या आवारात खेळात असताना त्यांच्या सोबत असाल वर्तन करत त्यांचा विनयभंग केला होता. याप्रकरणी मुकणे विरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५४ (अ) सह पॉक्सो कायद्याच्या कलम ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपस करणारे पोलीस उप निरीक्षक विजय गोडसे यांनी मुकणे विरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. या पुराव्याने ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी मुकणेला ३ वर्षे कारावासाची शिक्षा व ४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, रवींद्र मुकणेची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments