राजतंत्र न्यूज नेटवर्क
दि. 24 : नूतन बाल शिक्षण संघ संचलीत म बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी अरुणा एरंडे, महेश कारीया, ज्येष्ठ विधीज्ञ प्रकाश करंदीकर, दिनेश पाटील, संध्या करंदीकर, श्रीराम पटवर्धन, श्याम वाघ, चंद्रेश जोशी, अशोक पाटील आदी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यापक विद्यालयाच्या ज्या माजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विविध गौरवास्पद कार्य केल्याबद्दल पुरस्कार मिळाले अशा गुणवंत शिक्षकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.