डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवक पदासाठी 104 उमेदवार

0
2024

राजतंत्र मिडीयाcropped-LOGO-4-Online.jpg
दि. 26 : डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीत उतरलेल्या 133 उमेदवारांपैकी छाननीमध्ये 29 अर्ज बाद ठरल्यानंतर 104 उमेदवार रिंगणात उरले असून नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेल्या 9 उमेदवारांपैकी 2 अर्ज बाद ठरल्यानंतर 7 उमेदवार रिंगणात उरले आहे. 25 नोव्हेंबर रोजी रात्री उशीरापर्यंत चाललेल्या छाननीमध्ये विविध कारणांनी 31 उमेदवारांचे लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न भंग पावले आहे.
नगराध्यक्षपदासाठी बाद होणार्‍या उमेदवारांमध्ये विद्यमान नगरसेवक राजेंद्र माच्छी (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सईद शेख (काँग्रेस) यांचा समावेश आहे. राजेंद्र माच्छी यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याने तो नाकारण्यात आला. सईद शेख यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज सोबत पक्षाचा ए बी फॉर्म (तिकीट) नसल्यामुळे नाकारण्यात आला तर नगरसेवकपदासाठीचा अर्ज 3 अपत्य असल्याच्या कारणाने नाकारण्यात आला. राष्ट्रवादीच्या राणी महेश पवार, भाजपचे यशवंत कडू, काँग्रेसचे ज्ञानेश्वर चौधरी यांचेही अर्ज नाकारण्यात आले. शिवसेनेच्या दीपा कणबी यांचा अर्ज उशीरा सादर केल्याच्या कारणाने फेटाळण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुपाली राठोड यांच्या अर्जावर स्वाक्षरी नसल्याने फेटाळण्यात आला.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार : मिहीर शहा (राष्ट्रवादी काँग्रेस), भरत राजपूत (भाजप), संतोष शेट्टी (शिवसेना), अशोक माळी (काँग्रेस), डॉ. अमित नहार (भाजप बंडखोर), दिलीप वळवी (बहुजन विकास आघाडी), अनिल पष्टे (अपक्ष)

निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोएल यांच्यावर मनमानीपणाचा आरोप!
सविस्तर वृत्त वाचा 28 नोव्हेंबर च्या अंकात!

Print Friendly, PDF & Email

comments