डहाणू नगरपालिका निवडणूक 2017 : अजूनही सर्व पक्षांमध्ये उमेदवारीबाबत अनिश्चितता

0
546

राजतंत्र न्युcropped-LOGO-4-Online.jpgज नेटवर्क
डहाणू नगरपालिका परिषदेच्या 13 डिसेंबर 2017 रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे शेवटचे 3 दिवस बाकी असताना सर्वच राजकीय पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. ऐन वेळी दगा फटका होऊ नये याची काळजी म्हणून उमेदवारी यादी शक्य तितक्या उशिरापर्यंत लांबवली जात आहे. अनेक उमेदवार एकाचवेळी अनेक पक्षांशी चर्चा करताना दिसत आहेत.
भाजपने घेतली काळजी!
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये येणार्‍या नगरसेवकांवर काल भाजप नेत्यांनी कॅमेर्‍यात कैद करुन भाजपचे लेबल चिकटवले. अनेक आयाराम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांशी संपर्कात होते. राष्ट्रवादी काँग्रेस हवे त्या प्रभागातून तिकीट हातात घेऊन आमच्या मागे आहे असे दाखवत भाजपशी बार्गेन करीत होते. त्यासाठी वेळकाढूपणा करीत होते. मात्र भाजपने अल्टीमेटम देऊन हा प्रश्‍न मिटवला असला तरी काही जण माघारी तर जाणार नाही ना? असा प्रश्‍न भाजपला सतावतो आहे. भाजपच्या प्रेमात असलेले राष्ट्रवादीचे शशीकांत बारी यांनी मात्र अजून भाजप प्रवेश कॅमेर्‍यासमोर टाळला आहे.
शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला
शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी संतोष शेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना अजूनही अधिकृत घोषणा देणे टाळले जात आहे. अन्य उमेदवार स्पर्धेत नसला तरी नगरसेवक पदांसाठी उमेदवार निश्चित झाल्यानंतरच सर्वांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नाही
डहाणू तालुक्यावर अधिराज्य गाजवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार नसल्यामुळे आमदार आनंद ठाकूर यांचे निवडणूकीआधीच नाक कापले जाण्याची शक्यता आहे. पक्षाला नगरसेवक पदांसाठी सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात मात्र यश येताना दिसते आहे. प्रदीप चाफेकर यांना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची हौस भागविण्याची संधी देऊन मागील निवडणूकीत एकतर्फी विजयासाठी लढणारी राष्ट्रवादी आता पुंगी वाजवून बघू या मुड मध्ये पहायला मिळत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments