मुरबे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; 3 आरोपींना अटक

0
912

न्यायालयाने 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

राजतंत्र : वार्ताहर
पालघर : एका अल्पवयीन मुलीवर मागील सहा महिन्यांपासून बलात्कार करून त्याचे व्हिडियो व्हायरल करण्याची भीती दाखवून सामूहिक अत्याचार करणाऱ्या मुरबे येथील तीन तरुणां विरोधात बलात्कार, पोस्को अंतर्गत सातपाटी सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पालघर न्यायालयाने आरोपींना 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एका 16 वर्षीय मुलीचे आपल्याच गावातील तारापूर औद्योगिक वसाहती मधील कारखाण्यात काम करणाऱ्या हर्षल देव रा.मुरबे (22वर्ष) ह्यांच्याशी प्रेम जडले.ह्या प्रेम संबंधातून त्याची अनेक वेळा जवळीक वाढल्याने आरोपी प्रियकराने तिच्या कडे शरीर सुखाची मागणी केली. परंतु मी अजूनही अल्पवयीन असल्याने मी सज्ञान झाल्यावर लग्न करू असे त्या मुलीने त्याला समजावून सांगितले. परंतु हर्षल ने जबरदस्ती करीत तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करून त्याचा एक व्हिडिओ ही काढला. ह्या व्हिडियोची अनेक दिवस मजा लुटून हर्षल ने तो व्हिडीओ आपल्या काही मित्रांना दाखवला. त्या व्हिडियोचा दुरुपयोग करीत त्याचे मित्र अभिषेक देव आणि तुषार नलावडे दोघेही राहणार मुरबे

ह्यांनी आपल्या मित्राच्या प्रेयसीशी थेट संपर्क साधून मित्राशी शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास गावात सर्वत्र आपली व आपल्या कुटुंबियांची बदनामी होईल ह्या भीतीतुन मागील अनेक महिन्यापासून तिच्याशी प्रियकर आणि त्यांच्या मित्राने आपल्याशी संबंध ठेवल्याचे त्या मुलींनी तक्रारीत म्हटले आहे. वारंवार जबरदस्तीने व्हिडीओ चा धाक दाखवीत आता पर्यंत तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आले असल्याची माहिती पुढे येत आहे.त्या तरुणी कडे वारंवार शरीर सुखाची मागणी वाढू लागल्याने मानसिक खच्चीकरण झालेल्या त्या मुलीने आपल्या आत्याला आपल्यावरील अत्याचाराची सर्व हकीकत सांगितली.त्या नंतर त्या तरुणींनी आपल्या कुटुंबियां सह सातपाटी सागरी पोलीस गाठले. आणि तीन आरोपी विरोधात सामूहिक बलात्कार, आणि लैगिक गुन्ह्या पासून बालकांचे संरक्षण(पोस्को) आदी कलमान्वये सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपींना पोलिसांनी अटक केल्या नंतर त्यांना सोमवारी पालघर न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सपोनि सुधीर धायरकर ह्यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email

comments