कोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी

जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचाही घेतला आढावा !

0
1191

पालघर, दि. 19 : कोकण विभागीय आयुक्त व्हि. बी. पाटील यांनी आज, सोमवारी सिडकोमार्फत उभारण्यात येत असलेल्या पालघर जिल्ह्याच्या नविन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व पोलीस अधिक्षक कार्यालयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर सिडकोच्या अधिकार्‍यां समेवत आढावा बैठक घेतली.

आपल्या पाहणी दौर्‍यात पाटील यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची देखील पाहणी केली. तसेच येथील कोविड उपचार केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत कोविड नियंत्रणाबाबत चर्चा केली. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट (पीएलसी) बाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. ग्रामीण रुग्णालय भेटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत नियोजन व विविध प्रकल्पांच्या भुसंपादनासंदर्भात आढावा घेतला. कोविडच्या तिसर्‍या संभावित लाटेचा धोका ओळखून सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी अधिकारी वर्गाला दिले.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक दतात्रेय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments