डहाणू, दि. 14 : इंधन दारवाढविरोधात काँग्रेस पक्षातर्फे राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यानुसार आज, बुधवारी डहाणू तालुका काँग्रेसतर्फे शहरात सायकल मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर स्वाक्षरी मोहिम राबवून इंधनाचे दर कमी करण्याबाबतचे निवेदन प्रांत अधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्याकरीता देण्यात आले. काँग्रेसचे डहाणू तालुका अध्यक्ष संतोष मोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत उपाध्यक्ष हाफीजुभाई खान, अशोक माळी, अॅड. शिलानंद काटेला, नगीन देवा, सेवादलचे अध्यक्ष सुधाकर राऊत, शहर अध्यक्ष समर्थ मल्हारी, कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेश दुबळा, जिमी पटेल, चेतन माह्यावंशी, डॉक्टर सेलचे अध्यक्ष महेश पाटील व भावेश माह्यावंशी, अंकित आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते सहभागी सहभागी झाले होते.
